To fight terror The center should take Shivaji Maharaj as an Idol

13 03 2008

दहशतवादाच्या विरोधात केंद्रशासनाने छ. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा ! – नरेंद्र मोदी

<!–

12-03-2008 by shashi

–>

`फॅक्ट’निर्मित शिवरायांवरील चित्रप्रदर्शनाला श्री श्री रविशंकर यांची भेट

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – अल्पवयात कोट्यवधी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारा, अनेक लढाया जिंकणारा, जनतेला सेवासुविधा पुरवून संतुष्ट ठेवणारा, असा वीरपुुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्‍त दुसरा कोणी नाही.

दहशतवादाच्या समस्येबाबत निष्क्रिय रहाणार्‍या केंद्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
`फाऊंडेशन अगेंस्ट कन्टीनुइंर्ग टेरेरिझम’ (फॅक्ट) यांच्यातर्फे ८ ते १८ मार्चपर्यंत पु.ल. देशपांडे अकादमी येथे आयोजित `आधुनिक भारताचा नायक छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाचे आज औपचारिक उद्घाटन झाले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात `आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर, भाजपचे नेते श्री. गोपीनाथ मुंडे, भाजपचे माजी खासदार श्री. प्रफुल्ल गोराडिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन `फॅक्ट’चे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार श्री. फ्रान्सुआ गोतिए यांंनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ लढायाच करत नव्हते, तर ते उत्तम प्रशासक होते. ३०० वर्षांपूर्वीचे हे महान व्यक्‍तीमत्त्व आजच्या राज्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे; मात्र दुर्दैवाने विद्रोही विचारांचे लोक छ. शिवाजी महाराजांचा इतिहास नाकारतात. त्यामुळे १८५७ च्या स्वातंत्रसंग्रामाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आजची पिढी त्याला `बंड’ म्हणून संबोधत आहे. त्यामुळे तरुण पिढीला खरा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे आणि अशा चित्रप्रदर्शनातून ही गरज पूर्ण होऊ शकते, असेही श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशातील नागरिकांमध्ये त्याग, निष्ठा आदी गुणांचे संवर्धन व जतन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वीरपुरुषांच्या इतिहासाची गाथा त्यांच्यासमोर मांडली पाहिजे. चेन्नईमधील फॅक्ट प्रदर्शन पोलिसांनीच तोडले, याचे दु:ख वाटते, याहून दुर्दैवी बाब कोणती आहे. दहशतवाद सहन करण्यामध्ये जगात इराकनंतर भारताचा उल्लेख होतो. आम्हाला क्रांतीने शांती हवी आहे आणि शांतीने क्रांती हवी आहे, असे सांगत श्री श्री रविशंकर यांनी श्री. फ्रान्सुआसारखे परदेशी नागरिक हिंदुस्थानासंबंधी आस्था बाळगून आहेत, अशा परदेशी नागरिकांची संख्या वाढून `वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असेही ते म्हणाले. या वेळी श्री. प्रफुल्ल गोराडिया यांनी आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याची आवश्यक आहे, असे सांगितले. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समिती व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सदस्यांचा सक्रीय सहभाग होता.


कॅप्टन बाना सिंग यांना `शिवाजी फॅक्ट पुरस्कार’
सियाचीनच्या युद्धात पाकिस्तानी सैनिकांशी एकट्याने कडवी यशस्वी झुंज देऊन त्यांना नामोहरम करणारे परमवीरचक्र मिळवलेले कॅप्टन बाना सिंग यांना आज `शिवाजी फॅक्ट पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या वेळी कॅप्टन बाना सिंग यांनी सांगितले की, सीमेवर जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांची सरकारला किंमत नाही. त्यामुळे तुटपुंज्या वेतनामुळे १ हजार २३३ ब्रिगेडीयर व कर्नल व साडेसात हजार केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी राजीनामा दिला. सैन्यदलातील ११ हजार मुख्यपदे रिक्‍त आहेत, अशीच परिस्थिती राहिली, तर देशाला कोण वाचवणार ? असा प्रश्‍न कॅप्टन सिंग यांनी उपस्थित केला. त्यावर खंत व्यक्‍त करत श्री श्री रविशंकर यांनी राजीनामा देणार्‍या त्या जवानांनी आमच्याकडे यावे, आपण मिळून देशासाठी समाजकार्य करू, असे म्हटले. (जे काम सरकारने करायला हवे, ते काम संतांना करावे लागत असेल, तर असे षंढ सरकार जनतेच्या काय कामाचे ? – संपादक) Courtesy: sanatan sanstha